Latest Posts

अतिदुर्गम भागात माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन संपन्न 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील अतिदुर्गम अश्या छत्तीसगड सीमेवरील गावांत माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते लाखो रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

अहेरी तालुका विस्ताराने मोठा असून या तालुक्याला छत्तीसगड आणि तेलंगाणा राज्याची सीमा लागून आहे. तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रयत्न सुरु असून कोट्यवधी रुपयांची निधी उपलब्ध करून दिली आहे. नुकतेच देचली, वेडमपल्ली, कोंजेड ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट विविध गावांत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, सभा मंडप आदी कामांचा समावेश आहे.

छत्तीसगड सीमेवरील विविध गावांत विकास कामासाठी मोठी निधी उपलब्ध झाल्याने या परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त करत मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचे आभार मानले. विकास कामांचा भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss