– युवा वर्गात राजेंचा प्रचंड लोकप्रियतेने अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी तालुक्यातील आलापल्ली लगतच्या तथा नागेपल्ली ग्रामपंचायत मधील वॉर्ड क्रमांक ३ मधील मोद्दुमडगू ह्या गावातील असंख्य महिला तथा युवकांनी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत नुकतेच मोद्दुमडगू येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपात अधिकृत प्रवेश केला. यावेळी राजेंनी भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सर्वांचे स्वागत केले, विविध पक्षांचे कार्यकर्ते सातत्याने भाजपात येत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
माझ्यावर विश्वास करून तुम्ही भाजपात प्रवेश केला आहे, तुमचा विश्वासघात मी कदापी होहु देणार नाही, तुमचा गावांतील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन राजेंनी ह्यावेळी केले, त्याला राजे साहेब आगे बडो.. हम तुम्हारे साथ है अशी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राजेंना जोरदार दाद दिली.
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे शांत व संयमी स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याचा तथा गरजूला मदत करण्याचा गुण, विकासाची दूरदृष्टी ह्यामुळे युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता असून त्यामुळे संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रातुन राजेंचा युवा नेतृत्वावर विश्वास करीत भारतीय जनता पार्टीत सातत्याने प्रवेश होत आहे तसेच राजेंसाठी सकारात्मक वातावरण आहे, यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.