– विजयी मोहिमेची जय्यत तयारी! : माजी खा. अशोक नेते यांचे प्रतिपादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), आणि पी.रि.पा. यांच्या महायुतीच्या ६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. माजी खासदार व भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महायुतीच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा जल्लोष अनुभवता आला.
उद्घाटन प्रसंगी माजी खासदार अशोक नेते यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत म्हटले की, निवडणुकीत मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींना उत्तर देण्यासाठी हे कार्यालय केंद्रबिंदू ठरेल. त्यांनी पुढे नमूद केले की, आजच्या या उद्घाटनाने निवडणुकीच्या दृष्टीने एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. महायुतीच्या विजयी मोहिमेची सुरुवात येथेच होत आहे.
कार्यक्रमात माजी खासदार अशोक नेते यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत, राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजना कशा महत्त्वाच्या आहेत, यावर भर दिला. महिला, शेतकरी आणि युवकांच्या कल्याणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. यावेळी विरोधकांच्या योजनांविरोधातील भूमिकेवरही त्यांनी टीका केली.
जनसंपर्क कार्यालय निवडणूक प्रचारात एक महत्त्वाचे साधन असल्याचे नमूद करत दोनदा आमदार व दोनदा खासदार याच प्रचार कार्यालयाच्या माध्यमातुन होऊन या द्वारे जनहित संपर्क वाढला जातोय पुढे बोलत अशोक नेते म्हणाले, मतदारांच्या समस्या, अपेक्षा आणि अडचणींचा प्रत्यक्ष संवाद याच कार्यालयाच्या माध्यमातून साधला जाईल. यामुळे मतदारांना उमेदवाराविषयी विश्वास वाढेल.
प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत डॉ. मिलिंद नरोटे यांना विजयी करण्याचा संकल्प दृढ केला. डॉ. नरोटे हे प्रगतीशील विचारांचे प्रतिनिधी असून जनहितासाठी कार्यरत असलेल्या उमेदवार असल्याचे नेत्यांनी सांगितले. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात मंचावर उपस्थित मान्यवर माजी खा. अशोक नेते, महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेवराव उसेंडी, शिवसेना नेते हेमंतजी जब्बेवार, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा नेत्या डॉ. चंदा कोडवते, शिवसेनेचे नेते राजु कावडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे आणि शिवसेनेच्या नेत्या नीता वडेट्टीवार,अविनाश वरघंटे, दीपक बारसागडे यांसह मोठ्या संख्येने महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असताना, प्रचार मोहिमेच्या या जनसंपर्क कार्यालयाने कार्यकर्त्यांना नवा जोम दिला असून, आगामी निवडणुकीत डॉ. मिलिंद नरोटे यांना विजय मिळवून देण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत.