Latest Posts

भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी घर घर चलो, महा जनसंपर्क अभियानाला सुरुवात करावे

– महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांचे महिला पदाधिकाऱ्यांना आवाहन
– गीता हिंगे यांच्या नेतृत्वात व उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गिरजा कोरेटी यांचा भाजपामध्ये प्रवेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भाजपा महिला मोर्चा तालुका कोरची बैठक महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष गीता हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका योगिता यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कोरची तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.

यावेळी बैठकीला जिल्हा महामंत्री प्रीती शंभरकर, भाजप ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, गडचिरोली महिला मोर्चा शहराध्यक्षा कविता उरकुडे, कोरची महिला मोर्चा तालुका अध्यक्षा शीला सोनकत्री, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा दुर्गा मडावी, जयश्री ढवळे, कोरची न.प. माजी नगराध्यक्ष ज्योति नैताम, मालता हिडामी, शांता मडावी, दुर्गा मडावी, प्रतिभा मडावी, कौशल्या काटेंगे, आणिता नरोटी, निलकमल मोहूर्ले, मंजुषा कुमरे, सगुणा काटेंगे, जया सहारे, जया बागडे तसेच भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नेत्या गिरजा कोरेटी यांनी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केले. त्याप्रसंगी गीता हिंगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षांमध्ये स्वागत केले.

यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांनी महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

त्याप्रसंगी त्या बोलत होत्या की, आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका केव्हाही लागू शकतात त्याकरिता सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी बूथ पालक, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख या सर्वांना सोबत घेऊन सर्व बूथ निहाय बैठकीचे आयोजन करावे.

केंद्र व राज्य सरकारच्या लाभदायक योजना घरा घरा पर्यंत पोहोचवाव्या. आयुष्यमान भारत, विश्वकर्मा योजना, लेक लाडली योजना व ओबीसी जनते करिता राज्य सरकारने नमो घरकुल योजना चालू केलेली आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यास जनतेस सहकार्य करावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये सामान्य जनतेसाठी काढलेल्या योजना व केलेल्या कामांचे पत्र घर घर चलो व महा जनसंपर्क अभियाना अंतर्गत प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवावे असे, आवाहन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांनी केले.

Latest Posts

Don't Miss