Latest Posts

बोंडे कुटुंबीयांची अनोखी दिवाळी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : दिवाळी हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणुन ओळखला जातो. भारतातच नव्हे तर जगभरात हा सण उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी म्हटंल की, दिव्यांची आकर्षक सजावट, गोड धोड पदार्थांची रेलचेल, नविन कपडे आणि फटाक्यांची आतिषबाजी हे समिकरण ठरले आहे.

दिवाळी सणात सर्वच जण फटाके फोडून आनंद साजरे करतात. यासाठी हजारो रुपयांचे महागडे फटाके घेण्यावर अनेकांचा भर असतो. यातून क्षणिक आनंद मिळत असला तरीही हजारो रुपयांचा चुराडा होतो असे मानणारेही अनेक जन असतात.

त्यामूळे फटाक्यांवर होणारा हजारो रुपयांचा खर्च टाळून त्या पैशातून गरजूंना दिवाळीचा फराळ आणि फळे वाटून भामरागड येथिल बोंडे कुटुंबीयांनी दिवाळी साजरी केली आणि अनोखा आदर्श निर्माण केला. नागपुर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या प्रणय बोंडे यांनी यावर्षी भामरागड येथिल ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना दिवाळीचा फराळ आणि फळे वाटून दिवाळी साजरी केली. त्यांच्या या उपक्रमात बंडू बोंडे, कलावती बोंडे, तनिषा बोंडे, हर्षल ताजने, साहिल कुळमेथे यांनीही सहभाग घेतला होता.

Latest Posts

Don't Miss