– चामोर्शी येथे पक्ष संघटनात्मक बैठक संपन्न.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : भाजपा चामोर्शी तालुका व शहराच्या वतीने पक्ष संघटनात्मक बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम गृह चामोर्शी येथे आयोजित करण्यात आली.
या बैठकीला ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा विस्तारक ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, गडचिरोली विधानसभा बूथ विस्तारक तथा जिल्हा उपाध्यक्ष दामोधरजी अरगेला, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निलजी वरघंटे, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेठकर, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री भास्कर भुरे, तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर, शहरध्यक्ष सोपान नैताम, किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री शेषराव कोहळे, बंगाली आघाडी जिल्हा महामंत्री मनोरंजन हलदार, विनोद गौरकार, संजयजी पंदीलवार, प्रकाश सरकार, उत्तम मेश्राम, विठ्ठला आवारी, रेवनाथ कुशराम, सुनील कन्नाके, वासुदेव चिचघरे, काशिनाथ बुरांडे, राजू धोडरे व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
बूथ सशक्तिकरण अभियानांतर्गत जनतेमध्ये असा स्पष्ट संदेश दिला जाणार की, आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांमध्ये उमेदवार कोणीही असो, संघटनेचा उमेदवार एकच आहे. तो म्हणजे कमळ जिथे कमळ आहे, तेथे त्यांचे कल्याण आहे. याची खात्री जनतेला मिळेल व प्रत्येक कार्यक्रमांमध्ये कमळ चिन्हाला प्रथम प्राधान्य दिले जाईल. असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी व्यक्त केले.
जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी चामोर्शी तालुक्यातील ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समिती क्षेत्रामध्ये प्रमुख अध्यक्षांची निवड केले व सर्व अध्यक्षांनी व बूथ पालक शक्ती केंद्र, बुथ प्रमुखांनी प्रत्येक बुथांवर बैठक आयोजित करावे व महविजय २०२४ साठी बूथ समिती मधील ११ कार्यकर्त्यांचे कार्य विभाजन करून बूथ सशक्तिकरण व संघटनात्मक बांधणी करा, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले.