Latest Posts

ब्रिटनच्या सरकारमध्ये फेरबदल : माजी पंतप्रधानांची परराष्ट्र मंत्री पदी नियुक्ती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांनी मंत्रीमंडळात बरेच बदल केले. यातील सर्वात धक्कादायक बदल म्हणजे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची परराष्ट्र मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कॅमेरून हे सलग सहा वर्ष ब्रिटनचे पंतप्रधान होते व गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून दूर होते.

ब्रिटनच्या माजी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी त्यांच्याच अख्त्यारितील पोलीस खात्यावर टीका करणारा एक लेख लंडनच्या द टाईम्स या वृत्तपत्रात लिहला होता. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्या लेखात ब्रेव्हरमन यांनी लंडन पोलिसांना पॅलेस्टाईन धार्जिणे म्हटले होते. या लेखामुळे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक व त्यांच्या सरकारवर सध्या टीका होत आहे. त्यामुळे सुनक यांनी ब्रेव्हरमन यांना निलंबीत केले असून त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेवर्ली यांची गृहमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. व क्लेवर्ली यांच्या परराष्ट्र मंत्रीपदी डेव्हिड कॅमेरून यांची नियुक्ती करण्यात आली.

कॅमेरून यांनी राजकीय संन्यास घेतल्याचे बोलले जात असतानाच अचानक त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कॅमेरुन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

Latest Posts

Don't Miss