Latest Posts

चीननंतर आता ब्रिटनची वाढली चिंता : एका रुग्णामध्ये आढळला हा धोकादायक व्हायरस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : जगातील अनेक देश सध्या धोकादायक आजारांशी लढत आहेत. एकीकडे चीनमध्ये न्यूमोनियाने कहर केला आहे. आता स्वाइन फ्लूच्या H1N2 ने ब्रिटनची चिंता वाढवली आहे. डुकरांमध्ये आढळणारा हा स्ट्रेन मानवामध्ये आढळण्याची ही पहिलीच घटना आहे.

यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने (यूकेएचएसए) याची पुष्टी केली आहे. उत्तर यॉर्कशायरमध्ये एका व्यक्तीच्या श्वसनाच्या समस्येसंदर्भात टेस्ट करण्यात आली. यावेळी स्वाइन फ्लूचा H1N2 हा आजार आढळून आला.

दरम्यान, हा व्हायरस डुकरांमध्ये आढळतो. परंतु ब्रिटनमधील एखाद्या व्यक्तीमध्ये फ्लूचा हा पहिलाच प्रकार आहे. त्या व्यक्तीमध्ये स्वाइन फ्लूची सौम्य लक्षणे होती आणि तो आता पूर्णपणे बरा आहे. मात्र, स्वाइन फ्लूचा हा प्रकार किती धोकादायक आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. ज्या व्यक्तीमध्ये स्वाइन फ्लूचा हा आजार आढळून आला आहे, ती व्यक्ती डुकरांच्या संपर्कात असल्याचे आढळून आलेले नाही.

याचबरोबर, या स्ट्रेनमुळे साथीच्या रोगाचा प्रसार होण्याच्या शक्यतेवर भाष्य करणे घाईचे ठरेल. आरोग्य अधिकारी संसर्गाचा सोर्स शोधण्यासाठी सतत काम करत आहेत. मात्र त्याचा सोर्स अद्याप सापडलेला नाही, असे युकेएचएसएने सांगितले. तसेच, रुग्णाला सौम्य आजार आला होता आणि तो पूर्ण बरा झाला आहे. नियमित राष्ट्रीय फ्लू निरीक्षणादरम्यान संसर्ग आढळून आला आणि संसर्गाचा सोर्स अद्याप समजलेला नाही, असेही युकेएचएसएने सांगितले. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, गेल्या 20 वर्षांत जगभरात A(H1N2)v ची 50 मानवी प्रकरणे समोर आली आहेत.

युकेएचएसएच्या संचालक मीरा चंद म्हणाल्या, फ्लूचे नियमित निरीक्षण आणि सतत जीनोम सिक्वेन्सिंगमुळे आम्ही हा व्हायरस शोधू शकलो. यूकेमध्ये मानवांमध्ये हा व्हायरस पहिल्यांदाच आढळला आहे, जो डुकरांमध्ये आढळणाऱ्या व्हायरससारखाच आहे. आम्ही रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यासाठी आणि कोणताही प्रसार कमी करण्यासाठी त्वरीत काम करत आहोत. दरम्यान, 2009 मध्ये H1N1 मुळे झालेल्या महामारीमुळे ब्रिटनमध्ये 474 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, यामुळे जगभरात जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती.

Latest Posts

Don't Miss