Latest Posts

किराणा दुकानात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक : १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

– रामनगर पोलिसांची कारवाई 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : रामनगर सिद्धी कॉलनीतील दुर्गा माता मंदिराजवळ राहणाऱ्या आकाश गिदवानी यांच्या किराणा दुकानातून हजारो रुपयांची रोकड आणि सिगारेट चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला रामनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

किराणा व्यापारी आकाश वासुदेव गिदवानी (३२) यांनी ९ जानेवारी ला तक्रार दिली होती की, ७ जानेवारीला रात्री दुकान बंद करून ते घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता त्यांना दुकानाचे सेंटर लॉक तोडून हजारो रुपयांची रोकड व सिगारेटची पाकिटे चोरीला गेल्याचे दिसले. रामनगर पोलिस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकला माहिती मिळाली की, तेलंगणा राज्यातील मानकचंद बुधाराम कुमावत (३५) हा मूळचा राजस्थान राज्यातील पाटवा गावचा रहिवासी आहे.

 

आणि सध्या ते तेलंगणा राज्यातील इद्रेशाम ता. पट्टणचूर जि. संगारेड्डी, व त्याचे सोबती भांडाराम उर्फ ​​बाबू करणाराम कुमावत (३८) आणि गणपत बगदाराम कुमावत यांनी ही चोरी केली आहे. पोलिसांनी तपास केला असता आरोपींना सोलापुरात अटक केल्याचे समजले. त्याआधारे रामनगर पोलिसांनी सोलापूर येथून आरोपींना अटक करून चंद्रपूर चोरीबाबत चौकशी केली असता चोरीचा माल हैदराबाद येथे ठेवल्याचे निष्पन्न झाले.  त्या आधारे पोलीस पथकाने हैदराबाद येथून १ लाख १६ हजार १६४  रुपये किमतीची सिगारेटची पाकिटे जप्त केली.

 

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु,  उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उगले, पोहवा पेत्रस सिडाम, पोहवा शरद कुडे, पोहवा सचिन गुरनुले, पोहवा आनंद खरात, पोहवा  प्रशांत शेंद्रे, पोहवा लालु यादव, मपोहवा मनिषा मोरे,  पोशि हिरालाल गुप्ता, पोशि रविकुमार ढेंगळे, पोशि प्रफुल पुप्पलवार, पोशि संदीप कामडी, पोशि पंकज ठोंबरे, कन्हैय्या पवार मपोशि ब्युलटी साखरे यांनी केली.

Latest Posts

Don't Miss