Latest Posts

रात्री ८ ते १० दरम्यानच फोडा फटाके : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्तांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : शहरातील वायुप्रदूषणावर नियंत्रण आणून नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेद्वारे फटाके फोडण्यासाठी आता रात्री ८ ते १० वाजताची वेळ निर्धारित केली आहे.

नागरिकांनी कमीत कमी वायू व ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.

वायुप्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशान्वये वायू गुणवत्ता संचालन विभागाच्या नोडल अधिकारी डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्याचे दिशानिर्देश जारी केले आहेत. तसेच संबंधित विभागांना याबद्दल आपल्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देशदेखील दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे फटाके फोडण्यासाठी वेळ निर्धारित करण्यात आली असून, या वेळांच्या योग्य पालनाबाबत कार्यवाहीच्या दृष्टीने महानगरपालिकेसह नागपूर पोलिस विभागालादेखील उच्च न्यायालयातर्फे सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत नागरिकांनी रात्री ८ ते १० वेळेतच फटाके फोडावेत. त्यातही शक्यतो कमीत कमी वायू व ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडावेत.

Latest Posts

Don't Miss