Latest Posts

संत निरंकारी मंडळातर्फे नागपूर येथे महाराष्ट्राचा ५७ व्या वार्षिक समागमांचे आयोजन 

– २६ ते २८ जानेवारी रोजी आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : संत निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये महाराष्ट्राच्या ५७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन २६, २७ व २८ जानेवारी २०२४ ला दु. २.३० ते रात्री ९.०० वाजे पर्यंत व सत्संग रात्री ९.०० वाजे पासून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे प्रवचन राहील. मानवी जीवन अंतर्मनातील शांतीसुखाने परिपूर्ण करत विश्वामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा कल्याणकारी संदेश जनमानसापर्यंत पोहचविणे हा या संत समागमाचा हेतू आहे.

या समागमाच्या माध्यमातून माजवता, मानव एकता, शांती, समानता आणि विश्वबंधुत्वाची उदात्त शिकवण कोणत्याही भेदभावाविना समस्त मानवमात्राला देण्याचे कार्य केले जाते. त्याकरिता मानवतावादी आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक सेवेमध्ये संत निरंकारी मिशन बहुमूल्य योगदान देत आहे. याशिवाय स्वच्छता अभियान, रक्तदान, पर्यावरण रक्षणासाठी वननेस वन (नागरी वृक्ष समूह लागवड) वृक्षारोपण, स्वच्छ जल-स्वच्छ मन, तलासरी येथे आदिवासींसाठी सिमेंट नाला बांध प्रकल्प, मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु ऑपरेशन शिबिरे, मोफत आरोग्य शिबिरे, मोफत दवाखाने, महिलांसाठी प्रशिक्षण असे अनेक विविध उपक्रम राबविले जातात.

१ जानेवारी, १९६८ रोजी महाराष्ट्राचा पहिला संत समागम सुप्रसिद्ध शिवाजी पार्क मैदान, दादर, मुंबई येठे आयोजित करण्यात आला. व मागील वर्षी जानेवारी २०२२ मध्ये महाराष्ट्राचा ५६ वा निरंकारी संत समागम छत्रपती संभाजी नगर येवे येथे आयोजित करण्यात आला. व यावर्षी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर नगरी येथे संत समागम आयोजित करण्यात आले आहे.

सदर संत समागमासाठी महाराष्ट्राच्या काना कोप-यातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून लक्षाधी भाविक उपस्थित राहतात. विदेशातूनही शेकडो प्रतिनिधी या कार्यक्रमाला येत असतात. तरी यावर्षी सुद्धा लक्षाधी भाविक संत समागमाला सहकुटुंब, इष्टमित्रासह उपस्थित राहावे, असे संत निरंकारी मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss