Latest Posts

ताडोबात जिप्सी चालकांनी घेरले वाघाला !

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर झोनमध्ये एका वाघाला जिप्सी चालकांनी घेरून ठेवल्याची घटना समोर आली आहे. वाघ बघण्याच्या स्पर्धेत असे प्रकार वारंवार होत असल्याने ताडोबा व्यवस्थापनाच्या काम करण्याच्या पद्धतीवर वन्यजीव प्रेमींकडून टीका होत आहे. वाघाला जिप्सी चालकांनी घेरल्याची ही घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने ताडोबा अंधारी वाघ प्रकल्पातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ताडोबाच्या कोअर झोनमध्ये जिप्सीस्वार पर्यटकांनी नियम धुडकावून वाघाला अशा प्रकारे घेरले की, वाघ त्रस्त झाला. वाघ आक्रमक झाला नाही अन्यथा ताडोबात मोठी घटना घडू शकली असती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील मोहर्ली ते खटोडा या रस्त्यावर ही घटना घडली. ताडोबात नियम मोडण्याची ही आतापर्यंतची सर्वात भीषण घटना असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे ताडोबा व्यवस्थापन हादरले आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर झोनमध्ये पर्यटन सुरू आहे. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार विस्तृत नियम व कायदे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र संबंधित घटनेच्या या चित्रात जिप्सी चालक, गाईड आणि पर्यटकांनी मिळून येथे नियमांची पायमल्ली करून वाघासोबतच आपला जीवही धोक्यात घातल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जिप्सीवर स्वार असलेल्या अनेक पर्यटकांमध्ये असहाय्य वाघ वाईटरित्या अडकल्याचे चित्रात स्पष्टपणे दिसत आहे. वाघाच्या देहबोलीवरून तो अस्वस्थ आणि घाबरलेला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे. ताडोबा कोअर झोनमधील मोहर्ली ते खटोडा रस्त्यावर ही घटना घडली. येथे जिप्सींना एकाच रांगेत चालण्याची परवानगी आहे.

Latest Posts

Don't Miss