– जयश्री वेळदा- जराते यांच्या पुढाकारातून शिबिरांचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सामाजिक दायित्व जोपासण्याच्या दृष्टीने मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून गरजूंच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्याने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये सदर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवारपासून या शिबिरांना सुरुवात करण्यात येत असून सोमवारला पुलखल, मंगळवारी मुडझा, बुधवारला शिवणी, गुरुवार गुरवळा, शुक्रवार मारकबोडी, तर शनिवारला मेंढा येथे पहिल्या टप्प्यात या मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११.०० ते ३.०० दरम्यान तज्ज्ञांकडून डोळे तपासणी तर ३.०० वाजता जयश्री वेळदा- जराते यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप असे. या शिबिरांचे नियमित वेळापत्रक राहणार आहे. सदर मोफत शिबिरांचा लाभ मोठ्या संख्येने जनतेने घ्यावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, रोहिदास कुमरे, जयश्री वेळदा – जराते, अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, देवेंद्र भोयर, तुळशीदास भैसारे, चंद्रकांत भोयर, नितीन मेश्राम, डंबाजी भोयर, देवानंद साखरे, वसंत चौधरी यांनी केले आहे.