Latest Posts

वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले : तिघांचा जागीच मृत्यू

– आकसापुर मार्गावरील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील कोठारी पोलीस स्टेशन अंतर्गत दोन दुचाकी गोंडपिपरी मार्गे चंद्रपूरला जात असताना विरुद्ध दिशेने चंद्रपूर वरून लोह खनिज आणण्याकरिता जाणाऱ्या हायवाची दुचाकींना जबर धडक दिली यात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोज रविवारला दुपारी १२ वाजता दरम्यान घडली.

अहेरी चंद्रपुर राष्ट्रीय महामार्गावर दिवस रात्र लोह खनिजाच्या कच्चा मालाची वाहतूक सुरू आहे. याआधी अनेक अपघात या मार्गावर घडले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला. काहींना अपंगत्व आले. हायवा वाहनाच्या धडकेत अनेकांना यापूर्वी जीव गमवावा लागला. असे असताना हायवाने दुचकीस्वारास चिरडल्याची घटना घडल्याने सुराजगड वाहन अजुन किती बळी घेणार असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.सोबतच अपघात घडत असल्याने  नागरिक हैराण झाले आहेत.

चंद्रपूर कोठारी मार्गावरील आक्सापूर येथील मंदिरासमोर एम एच ३३ के ६७३९ ,एम एच ३४ एजी ३२२४ या दोन दुचाकींना रविवारी दुपारच्या दरम्यान हायवाने धडक दिली व भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.घटनास्थळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस दाखल झाले आहे.

सदर हायवा वाहनाचा क्रमांक एमएच ४० सी एम ३२३३ असून शैलेंद्र कालिप्तराय (६३) रा. विजनगर मुलचेरा जि. गडचिरोली, अमृतोष सुनील सरकार (३४) कालीनगर, मनोज निर्मल सरदार (४३) विजयनगर असे  मृतकाची नावे आहेत. मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी बल्लारशाह येथील रुग्णालयात नेण्यात आले असून  पुढील तपास कोठारी व गोंडपिंपरी पोलीस करीत आहे.

मात्र घटना घडताच हायवा चालकानी घटनास्थळावरून पसार असून चालकाचा शोध सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss