Latest Posts

कर्करोगावर गोळी किंमत फक्त १०० रुपये : दुसऱ्यांदा कॅन्सर होणार नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : देशातील प्रमुख कर्करोग संशोधन आणि उपचार सुविधा असलेल्या मुंबईतील टाटा इन्स्टिटय़ूटने कर्करोगावर मात करणारे आणि त्याचा पुन्हा प्रादुर्भाव रोखणाऱया नव्या उपचाराचा शोध लावल्याचा दावा केला आहे.

टाटा संस्थेतील संशोधक आणि तज्ञ डॉक्टरांनी यावर १० वर्षे काम केले असून एक गोळी (टॅब्लेट) विकसित केली आहे. या गोळीमुळे कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांना पुन्हा कर्करोग होणार नाही. तसेच रेडिएशन आणि केमोथेरपीसारख्या उपचारांचे दुष्परिणामसुद्धा ५० टक्क्यांनी कमी होतील, अशी माहिती टाटा मेमोरियलचे वरिष्ठ कर्करोग सर्जन डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली.

स्वादूपिंड, फुफ्फुस आणि तोंडाच्या कर्करोगावरही हे ओषध प्रभावी ठरू शकणार आहे. या गोळीवर गेल्या १० वर्षांपासून काम सुरू होते. गोळीला अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाल्यानंतर येत्या जून ते जुलैपासून र्ही गोळी बाजारात उपलब्ध होईल.

Latest Posts

Don't Miss