विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी स्थापन केलेल्या पोलीस, एसएसटी व एफएसटी पथकाद्वारे जप्त करण्यात आलेल्या रोख रक्कम व इतर मौल्यवान साहित्याबाबत तक्रारीचे निवारण करण्याचे दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हा तक्रार निवारण समितीची स्थापन करण्यात आली आहे.
या पथकाद्वारे जप्त करण्यात आलेल्या रोख रक्कम व इतर मौल्यवान साहित्य परत मिळण्याबाबत आवश्यक त्या दस्तऐवजासह रामटेक लोकसभा अधिनस्त विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील तक्रारीचे करीता सीमा नन्होरे नोडल अधिकारी भ्रमणध्वनी क्रमांक ९४०४८३४०४३ व नागपूर लोकसभा अधिनस्त विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील तक्रारी करीता विलीन खडसे भ्रमणध्वनी क्रमांक ८४४६२४७६८६ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित बाबींचे तक्रार व अपिलासाठी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा खर्च संनियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे.