Latest Posts

चामोर्शी येथे मोफत मोतीबिंदू डोळे तपासणी तथा कृत्रीम मोतीबिंदू भिंगारोपन शिबिर संपन्न

– ४३० रुग्णांची तपासनी, १५३ रूग्ण ऑपरेशनसाठी पात्र

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : लॉयन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा, लॉयन्स क्लब चंद्रपुर युगल, महाविर इंटरनॅशनल चंद्रपुर केन्द्र, कुषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी, चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. चामोर्शी व गण्यारपवार फॉऊन्डेशन चामोशी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑक्टोबर २०२३ रोज रविवार ला कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, चामोर्शी येथे अध्यक्ष, चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या चामोर्शी तथा माजी सभापती कृषी व पशुसंवर्धन जि. प. गडचिरोली, अध्यक्ष गण्यारपवार फॉउन्डेशन नामोशी अतुल गं. गण्यारपवार यांनी पुढाकार घेवून वरिल संस्थांना सोबत घेवून विनामुल्य मोतीबिंदु डोळे तपासणी तथा कृत्रिम मोतिबिंदु भिंगारोपण शिबीराचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला सामाजिक कार्यामध्ये हिरहिरीने पुढाकार घेत असलेले व सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरीता मदत करून देणारे स्व. वीर नरपतचंद्र भंडारी त्यांचा अल्पशा आजाराने निधन झाल्याने श्रदांजली अर्पण करण्यात आली.

सदर शिबिरामध्ये चामोर्शी तालुक्यातील ४५५ रूग्णांनी सहभाग नोंदविले असून त्यापैकी ४३० रुग्णाची तपासणी करण्यात आली. त्यामुळे त्या रूग्णांची प्रत्यक्ष तपासणी सेवाग्राम मेडीकल कॉलेज, लॉयन्स आय हॉस्पीटलचे मुख्य डॉ. अजय शुक्ला साहेब, डॉ. सुमित ताकसांडे व डॉ. अजहर साहेब इतर वैद्यकिय अधिकाच्यांच्या नमु द्वारे तपासनी करण्यात आली यापैकी १५३ रूग्ण नेत्र तपासणी मध्ये शस्त्रक्रिया करीता पात्र झाले व त्याच दिवशी ७६ रूग्णाना ऑपरेशन करीता सेवाग्राम येथिल रूग्णालयात रूग्णावाहीका व टॅव्हल्स द्वारे पाठविण्यात आले. उर्वरित रूग्णांना ०१ व ०५ नोव्हेंबर २०२३ ला ऑपरेशन (शस्त्रक्रिया) करिता नेण्यात येणार आहे.

अतुल गंगाधरराव गण्यारपवार यांचे मार्गदर्शनाखाली सेवाग्राम वर्धा येथे शस्त्रक्रियेसाठी १५३ पैकी ७६ नेत्र रूग्णांना तात्काळ पाठविण्यात आले. मोतीबिंदू नेत्र तपासनी करिता सेवाग्राम येथिल सुसज्ज टिम येवून तपासणी करण्यात आली. ज्या रूग्णांना साधना अभावी स्व. गावी परत जाण्यासाठी एस टी बसेस सुटल्या त्या रूग्णांना खाजगी वाहन करून घरी सुखरूप पोहचविण्यात आले. या शिबिरामध्ये चामोर्शी तालुक्यातील अनेक गावामधून रुग्ण आले सर्व रूगणांना थंड पिण्याचे पाणी, चहा, नास्ता, व मसालाभाताची व्यवस्था करण्यात आले.

अतुल गंगाधरराव गण्यारपवार याच्या पुढाकाराने मागील अनेक वर्षांपासून लोकाच्या सेवेसाठी विनामुल्य कृत्रिम मोतिबिंदु भिंगारोपण मोतीबिंदु शस्त्रकिया शिबीर, रक्तदान, अन्नदान, शेतकऱ्यांना फळझाड वाटप तसेच धार्मिक व सामाजिक कार्यामध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणुन विविध प्रकारच्या रुग्णांना मदत होण्याच्या दृष्टीने सर्व मित्रमंडळ व कार्यकार्ये मागील ४० वर्षापासून अविरहत मदत करीत आहेत. आतापर्यन्त १००० हजार लोकांना विनामुल्य मोतीबिंदु डोळे तपासणी तथा कृत्रिम मोतिबिंदु भिंगारोपण शस्त्रकिया केली आहे. मागील वर्षीसुध्दा ५४३ लोकांचे ऑपरेशन करून त्यांना वरिल संस्थांच्या वतीने चष्मेसुध्दा वाटप करण्यात आले. वर्षातून २ वेळा विनामुल्य मोतीबिंदु डोळे तपासणी तथा कृत्रिम मोतिबिंदु भिंगारोपण शस्त्रकिया शिबीराचे आयोजन करण्यात येतो.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष, चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या चामोर्शी, अतुल ग. गण्यारपवार, प्रेमानंद मल्लीक उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी, महाविर इंटरनॅशनल चंद्रपूर केंन्द्रने अध्यक्ष त्रिशुल बम्ब, महाविर इंटरनॅशनल, चंद्रपूर बिरा केन्द्राचे सचिव श्रीमती लता वर्मा, महाविर इंटरनॅशनल विदर्भ फोन से सेअरमन मा. दिलीप भंडारी, निर्मल भंडारी अध्यक्ष लॉयन्स क्लब चंद्रपुर युगल, अनिकेत जैन सचिव, लॉयन्स क्लब चंद्रपुर युगल, डॉ. अजय शुक्ला सेवाग्राम मेडीकल कॉलेज लॉयन्स आय हॉस्पीटल, सेवाग्राम, अमोल गं. गण्यारपवार नगरसेवक मा माधव परसोड़े, गोसाई सातपुते, मा. सुधाकर निखाडे, माख्मा शंकर बंगावार २/३ वा अनिल नैताम, कौश्यल्या पोरटे, कांताबाई आभारे, कुंदा बासस्य कु उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी, गुरुदास पा. बुधरी, मुरलीधर डी. बुरे, अरुण पुल्लनाजी बंडावार, शामराव पा. पोरटे, अरुण का लाकडे, निलेश गुरुदास चुधरी, महादेव लहुजी पिपरे, वामन रामचंद्र गौरकार, अशोक आभारे, पुंजाराम वासेकर, साईनाथ पेटीवार संचालीका मंजूषा चलकलवार, मालता गुलाबसिंग पीती, बंडूजी ऐलावार, पा. गौरकार, सुरेश नैताम शहरध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चामोर्शी, नरेंद्र जुवारे, कबीर आभारे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चामोर्शी, विनोद शेंगर उपसरपंच, प्राचार्य घोटे , प्राचार्य मडावी, प्राचार्य नागोसे, मुख्याध्यापक तातावार, मुख्याध्यापक हुमणे, जे. विलास, प्र. व्यवस्थापक राकेश जे. पोरटे, निरिक्षक नरेश बेर, मधुकर एम पैदापल्लीवार शामराव डि. वालदे, मधुकर गव्हारे अ लिपीक, सचिन चलकलवार, चामोर्शी तालुका सहकारी खरेदी

विक्री संघाचे सर्व कर्मचारी वृंद, शरदचंद्र पवार कला महीला महविद्यालयाचे संपूर्ण लेक्चरर स्टॉप विद्यार्थिनी स्वयसेवक म्हणून उपस्थित होते स्व. जागेश्वर सावकार गण्यारपवार कला व विज्ञान महाविद्यालय घोट डिज्नीलँड प्रेसीडेन्सी इग्लीश मिडीअम स्कुल चामोर्शी, भारतरत्न राजीव गांधी विद्यालय मुरखळा, त्यागमूर्ती सोनिया गांधी विद्यालय मोहुली, परमपुज्य माहात्मा गांधी विद्यालय घोट, कुपी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी व चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य कार्यक व १५० स्वयंसेवकाने शिबीरासाठी आलेले सर्व महिला व पुरुषाने नोंदणी करण्याचे काम व ऑपरेशनसाठी लोकांना बसमध्ये बसवुन देण्याचे काम केलेत. शिबीराच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

Latest Posts

Don't Miss