Latest Posts

गुरांच्या- गोठ्याचे पैसे मिळवून देण्याकरिता माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : नरेगा अंतर्गत गुरांच्या- गोठ्याचे पैसे मागील चार वर्षापासुन ग्रामपंचायत लाहेरी येथील लाभार्थ्यांना मिळत असल्याने आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

भामरागड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत लाहेरी येथील लाभार्थ्यांना नरेगा अंतर्गत मागील चार वर्षापासून गुरांच्या- गोठ्याचे पैसे देण्यास टाळटाळ करण्यात येत आहे. मागील चार वर्षापासून पंचायत समिती भामरागड ला येण्याजाण्याकरीता अंदाजे २० हजार रुपये खर्च झाले. तरी सुद्धा लाभार्थ्यांकडे नरेगा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार या योजनेचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. त्याकरिता हक्काचे पैशे मिळवून देण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Latest Posts

Don't Miss