Latest Posts

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई {Mumbai} : पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसई बोर्डाचा निकाल हा विद्यार्थी आणि पालकांना ऑनलाईन पाहता येणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्ताने ८८ टक्के विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

पीटीआयने दिलेल्या वृत्ताने  ८८ टक्के विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ०.६५ टक्के निकालात वाढ झाली आहे.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीचा निकाल जाहीर केला. सीबीएसईच्या माध्यमातून शिक्षण घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आज लागला आहे. देशभातून २४ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर १.१६ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

कुठे आणि कसा चेक करायचा निकाल?
CBSE १२ वी परीक्षेचा निकाल तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवर घसबसल्या पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्ही https://cbseresults.nic.in/ या थेट लिंकवर जायचे आहे. तिथे तुम्हाला तुमचा सीट नंबर आणि इतर माहिती द्यायची आहे. तुम्हाला निकाल ऑनलाईन पाहता येईल. शिवाय निकालाची प्रतही काढता येईल. तुम्ही एसएमएस, डिजिलॉकर आणि इतर पोर्टलद्वारेही निकाल पाहू

Latest Posts

Don't Miss