Latest Posts

छ. संभाजीनगरमध्ये अग्नितांडव, छावणी परिसरात भीषण आग : ७ जणांचा मृत्यू

विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण आग लागली असून यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. छावणी परिसरात ही आग लागली. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

मात्र या दुर्घटनेत ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चार वाजण्याच्या सुमारास अस्लम टेलरच्या दुकानाला आग लागली. आगीत दुकानातील फर्निचर, काउंटर, सोफे आणि इतर साहित्य जळाले. मार्केट वस्तीतले हे दुकान आहे. दोन कुटुंब वरच्या मजल्यावर होते. खाली लागलेल्या आगीचा लोळ आणि धूर वरती गेल्याने सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

प्राथमिक अंदाज आहे की धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर याबाबत समजू शकेल. तसेच आग नेमकी कशामुळे लागले हे अद्याप समजू शकलेले नाही. आग इतकी भीषण होती की आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. पण आगीमुळे पसरलेले धुराचे लोट वरच्या मजल्यावर राहणाऱ्या घरात गेले. यामुळे गुदमरून ७ जण मृत्यूमुखी पडले.

Latest Posts

Don't Miss