Latest Posts

चामोर्शी येथील लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय मार्फत नियमित सेवा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : चामोर्शी तालुका स्तरावर लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय कार्यरत असून या दवाखान्यामार्फत नियमित सेवा देण्यात आहे, असे पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे.

चामोर्शी येथे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, पट्टीबंधक, परिचर व वरिष्ठ लिपीक यांचे प्रत्येकी ०१ पद मंजूर असून फक्त परिचर व वरिष्ठ लिपीक यांचे पद रिक्त आहे. तसेच परंतु सदर अधिकारी सद्यास्थितीत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, चामोर्शी येथेच कार्यरत आहेत.

येथील दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही पशुपालकाची / पदाधिकाऱ्याची / गावातील प्रतिष्ठीत नागरीकांची पशुवैद्यकीय सेवा नियमित मिळत नसल्याचे आजतागायत  तक्रार प्राप्त झालेली नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss