Latest Posts

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य जिल्हा कार्यकर्ता मेळावा गोपाला पॅलेस, बस स्टँड जवळ, बल्लारपूर येथे ४ मार्च ला सकाळी ११ वाजता आयोजित केले आहे.

सदर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळाव्यात नितीन भटारकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिल्हा चंद्रपूर, राकेश सोमानी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, जिल्हा चंद्रपूर, अभिनव देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, चंद्रपूर हे मार्गदर्शन करणार आहेत.

सदर मेळाव्यात जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी यांनी केला आहे.

Latest Posts

Don't Miss