Latest Posts

‘चारसो पार’मध्ये चंद्रपूरचाही समावेश राहणार : ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

– उपराजधानीत सुधीर आप आगे बढो हम तुम्हारे साथ है गजरात दुमदुमला विमानतळ परिसर
– नागपूर, खांबाडा, वरोरा, टेंभुर्डा येथे जल्लोषात भव्य स्वागत ; भद्रावती येथे जेसीबीतून फुलांची उधळण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत सोबत आहे. आज कार्यकर्त्यांचा उत्साह बघून, देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या ‘अब की बार चारसो पार’मध्ये आपल्या मतदारसंघाचाही समावेश असणार आहे, याची खात्री पटली आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (सोमवार) येथे व्यक्त केला.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आज प्रथम आगमन झाले. दुपारी साडेबाराच्या सुमारात नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले तेव्हा शेकडो कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. यावेळी ‘सुधीर भाऊ आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. नागपूर विमानतळावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजीव रेड्डी बोदगुलवार, संदीप धूर्वे, भाजपा ज्येष्ठ नेते चंदन सिंग चंदेल, भाजपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजू कक्कड, देवराव भोंगळे, अण्णासाहेब पारवेकर, आनंद वैद्य पांढरकवढा, घाटंजी तालुका अध्यक्ष श्री. डहाके, घाटंजी महामंत्री हितेश परचाके, रवी बेलूरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

नागपूर ते चंद्रपूर या प्रवासात जागोजागी त्यांचे स्वागत झाले. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘गेल्या तीस वर्षांपासून राज्य शासनाशी संबंधित प्रश्न मांडण्याची आणि मंत्री म्हणून प्रश्न सोडविण्याची संधी मला मिळाली. आता केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न सोडविण्याची संधी मिळणार आहे, त्याबद्दल देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. ज्या नवीन संसद भवनाच्या (सेंट्रल व्हिस्टा) बांधकामासाठी माझ्या मतदारसंघातील सागवान काष्ठ पाठवले, त्याच दरवाज्यातून संसद भवनात प्रवेश करण्याचा योग येणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आजवर केवळ जनतेच्या सेवेसाठी निवडणुक लढलो आणि आत्ताही जनतेची सेवा करण्यासाठीच लढणार आहे. कारण माझे ध्येय सामान्य माणसाची सेवा करणे एवढेच राहिले आहे. कोणत्याही पदावर असलो तरीही मी जीव ओतून काम करतो.’

ठिकठिकाणी जंगी स्वागत अन् भद्रावती येथे फुलांची उधळण :
नागपूर येथे विमानतळावर दमदार स्वागत झाल्यानंतर ना. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरच्या दिशेने निघाले. चंद्रपूर मार्गावर अनके गावांमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज होते. खांबाडा येथे वरोरा विधानसभेचे प्रमुख रमेश राजुरकर यांनी स्वागत केले. टेंभुर्डा येथे माजी जिल्हा परिषद सभापती राजू गायकवाड यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. वरोरा येथे ना. मुनगंटीवार यांचे रमेश राजुरकर, देवतळे व अहेतेश्याम अली यांनी भव्य स्वागत केले .यावेळी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश देखील झाला. भद्रावती येथे जेसीबिद्वारे फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रकांत गुंडावार अमित गुंडावार विजय पिदुरकर प्रवीण ठेंगणे गोपाल गोस्वाडे आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss