Latest Posts

चंद्रपूर पोलिसांनी तांत्रिक कौशल्य वापरून एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपुर (Chandrapur) : पोउपनि अतुल कावळे, पोलीस स्टेशन, रामनगर यांनी पोस्टला ३१ मार्च २०२४ रोजी तक्रार दिली की, २८ मार्च २०२४ रोजी नाईट ड्युटी ऑफिसर म्हणून डयुटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येथुन माहिती मिळाली की, बंगाली कॅम्प चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडियाचे ए.टि.एम. मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा माहिती वरून बँक ऑफ इंडिया, बंगाली कॅम्पचे ए.टि.एम मध्ये जावुन पाहीले असता, ए.टि.एम. मधुन जोर-जोराने खयरनचा आवाज येत असल्याचे तसेच ए.टि.एम. मधील सीसीटिव्ही. कॅमेऱ्यावर स्पे मारून कॅमेऱ्याचे वायर तोडल्याचे दिसुन आले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क. अप.क. ३६४/२०२४ कलम ३७९, ५११ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

नमुद गुन्हयाचे तपासा दरम्यान अज्ञात आरोपीना शोस घेणे कामी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, यांनी तात्काळ गुन्हें शोष पथक येशील अधिकारी तसेच कर्मचारीसह घटनास्थळी रवाना झाले. गुन्हे शोध पथकानी तात्काळ तांत्रिक कौशल्याचा वापर केले असता, एका काळया रंगाच्या थार मध्ये काही अज्ञात इसम ए. टि.एम. मधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. तेव्हा पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात पोउपनि मधुकर सामलवार तसेच कर्मचारी यांचे पथक तयार करून अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी रवाना केले. त्यावरून पोउपनि सामलबार यांचे पथक तांत्रिक कौशल्याचा वापर कारुन काळया रंगाच्या थार गाडीचा पाठलाग करीत टोल नाके चेक करीत नागपुर, हैदाबाद येथे जाऊन थार गाडी व आरोपीतांचा शोध घेत आरोपी हुसेन अली (२१) रा. पटेलवाडा, आमीरपेठ, हैद्राबाद यास ताब्यात घेवुन विवारपुस केले असता, त्यांने १) मो. आमीर उर्फ अरमान मलीक रा. हैद्राबाद, २) तस्सी उर्फ तस्लीम उदय खान (२६) रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य हरियाणा, ३) राशीद खान, रा. सिरोली, ता. पुणाना जि. मेवात, राज्य- हरियाणा, ४) सल्ली उर्फ सलमान रा. भरेंड, ता. फिरोजपुर, जि. मेवात यांचेसह ए.टि.एम. फोडन्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितल्याने मो. आमीर वर्क अरमान मलीक रा. हैद्राबाट पाना हुँदाबाद येथे शोष मेवला असता मिळून आला नाही. उर्वरीत आरोपीतांचा शोध घेणे कामी दिल्ली व हरीयाणा राज्यात गुरुग्राम, मेवात, फिरोजपुर येथे जावुन आरोपी राशीद खान, आरोपी सल्ली उर्फ सलमान आरोपीतांना शोष घेतला असता, नमुद आरोपी मिळुन आले नाही. गुन्हयातील आरोपी तस्सी उर्फ तस्लीम तदय खान, (२६) , रा. सिरोली, वा. पुणाना जि. मेवात याचा शोध घेत असतांना गुरूग्राम येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

नमुद कुन्हयातील आरोपीतांना पोलीस कस्टडी रिमांड घेवून गुन्हयात वापरलेली काळया रंगाची थार गाडी हेंद्राबाद येथुन किरायाने घेवून वेगवेगळ्या नंबर प्लेटचा वापर करून ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केले असे सागितले त्यावरून नमूद वाहन आरोपीकडुन एक काळया रंगाची धार गाडी कमांक टि.एस. ३१ जे. २२९९ जप्त केली तसेच अधिक विचारपुस केले असता, त्यांनी यापूर्वी जिल्हा- चंद्रपुर येथील पोलीस स्टेशन वरोरा तसेच नागपुर जिल्हयातील विविध ठिकाणी ४ ए.टि.एम. मशिन तोडुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न तसेच एका ठिकाणातील मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगत असून अधिक तपास सुरू आहे.

१) एक काळया रंगाची थार गाडी कमांक टि.एस. ३१ जे. २२९९ किमत १४ लाख २) एक काळया रंगाची स्प्रे बॉटल किमंत २०० रू. जप्त करण्यात आले.

गुन्हे शोष पथक येथील अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा व गुन्हयात वापरलेल्या काळया रंगाच्या थार गाडीचा शोध घेणे कामी अतिशय परिश्रम घेवून तात्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून आरोपीतांना ताब्यात घेवून अटक करण्यात आले.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जगबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी धाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, पो.नि. यशवंत कमद तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर सपोनि देविदास नरोटे, पोउपनि, मधुकर खामलवार, पोउपनि दिपेश ठाकरे, पोहवा/०९ सिडाम, पोहवा/२२९६ रजनिकात, पोहवा/१९७६ किशोर, पोहचा/२२७७ शरद, पोहवा/५३२ सतिश पोहवा/११६५ आनंद, पोहवा /२४५४ प्रशांत, नापोशि/२४३० लालु, पोशि/८२५ हिरालाल, पोशि/८४७ रविकुमार, पोशि/८८७ प्रफुल पोशि/८८१ सदिप, पोशि/२५१३ विकास, पोशि/६९९ विकास जाधव, पोशि/१२३० पंकन, मोहवा/४६२ मोरे पॉलीस स्टेशन, रामनगर तसेच सायबर पोस्टें, बदपुर येशील नापोशि/छगन, पोशि/वैभव, पोशि/भास्कर, पोशि/राहुल, पोशि/उमेश सहकार्याने कार्यवाही केली आहे.

Latest Posts

Don't Miss