Latest Posts

चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवणाऱ्यांवर बंदी

– व्हीआयपी (VIP) दर्शन राहणार बंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : उत्तराखंड चारधाम यात्रा (गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) १० मे २०२४ पासून सुरू झाली आहे. यानिमित्य नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. यातच आता उत्तराखंड सरकारने येथे येणाऱ्या भाविकांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे.

त्यानुसार चारधाम यात्रेला आलेल्या प्रत्येक यात्रेकरुंना मंदिराच्या ५० मीटरच्या परिसरात व्हिडिओ आणि रील बनविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

उत्तराखंडचे मुख्य सचिन राधा रतूडी यांनी पर्यटन सचिव गढवाल मंडलचे कमिश्नर, एसपी आणि जिल्हा कलेक्टर यांना याबाबत आदेश दिले आहेत. सध्याच्या काळात विविध ठिकाणी गेल्यानंतर सोशल मीडियावर रील बनवणे ही एक सवय प्रत्येक व्यक्तीला लागलेली आहे. त्यातला एक विषय म्हणजे, अनेक व्यक्ती फक्त रिल बनवण्यासाठी चारधामची यात्रा करतात असे दिसून आले आहे, त्यामुळे मंदिराच्या परिसरात अनावश्यक गर्दी होताना दिसून येते. अनेकदा रिल स्टारमुळे भाविकांना देवाचे दर्शनही नीट करता येत नाही. ही समस्या लक्षात घेता उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.

चारधाम यात्रेदरम्यान मंदिरांच्या साधारण ५० मीटरच्या परिसरात मोबाईल वापरण्यासाठी एसओपी जारी केली असून रील आणि व्हिडिओ बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या सर्वांवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवणार आहे. रीलच्या माध्यमातून अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते. त्यामुळे चारधाम यात्रेसंबंधित कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर प्रशासन गुन्हा दाखल करणार आहे.

VIP दर्शन बंद –
तसेच उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी शुक्रवार ३१ मे पर्यंत चारधाममध्ये व्हीआयपी (VIP) दर्शन बंद राहील असेही सांगितले आहे. चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मात्र भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी काही नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Latest Posts

Don't Miss