Latest Posts

चेरपल्ली नाल्यावर पूल तसेच नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून द्या

– राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे चेरपल्ली येथील नागरिकांनी निवेदनातून केली मागणी
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मागण्या पूर्ण करू राजेंनी दिली ग्वाही.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ट असलेल्या चेरपल्ली गावात सद्या विविध समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे, या समस्या तातडीने सोविण्याची मागणी चेरपल्ली येथील गावकऱ्यांनी एका निवेदनातून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे काल केले.

चेरपल्ली नाल्यावर सद्या पूल नसल्याने अहेरी पासुन १ किमी चेरपल्लीचे असलेले अंतर सद्या ४ किमीचा प्रवास गावकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना करावे लागत असल्याने प्रचंड मनस्ताप होत आहे, यामुळे तातडीने चेरपल्ली नाल्यावर नवीन पुलाची निमिर्ती करावे, अशी मागणी निवेदनातुन राजेंकडे करण्यात आले आहे.

चेरपल्ली गावातील कोणत्याही नागरिकांकडे स्वतःचा राहत्या घराचा मालकी हक्काचे दस्तावेज नसल्याने अनेक शासकीय योजनेपासून गावकऱ्यांना सद्या वंचित राहावे लागत आहे, प्रधानमंत्री आवास योजनाचा लाभही जनतेला अद्याप मिळाले नाही, त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून चेरपल्ली वासीयांना आखीव पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) उपलब्ध करून देण्याची मागणी ही चेरपल्ली येतील नागरिकांनी ह्या निवेदनातून राजेंकडे केले.

या प्रमुख मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपमुख्यमंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून चेरपल्ली गावकऱ्यांचा या प्रमुख मागण्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, असे आश्वासन राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी यावेळी उपस्थित चेरपल्ली गावकऱ्यांना दिले.

Latest Posts

Don't Miss