Latest Posts

छत्तीसगडच्या सुकमात चकमक : १० नक्षलवाद्यांचा खात्मा तर AK-४७ सह अनेक शस्त्रे जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / छत्तीसगड (Chhattisgarh) : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी २२ नोव्हेंबरला सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये  भीषण चकमक झाली. या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले आहेत. तर, भेज्जी भागात अजूनही चकमक सुरुच आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, आतापर्यंत ठार झालेल्या १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून AK-४७, एसएलआर आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, गुरुवारी नक्षलवादी ओडिशातून छत्तीसगडमध्ये घुसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर जवानांनी नक्षलवाद्यांचा शोध सुरू केला.

यादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले.

भेज्जी परिसर जंगलांनी वेढलेला  –
भेज्जी परिसरात डीआरजी आणि सीआरपीएफ टीमसोबत नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ज्या भागात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक होत आहे तो परिसर जंगलाने वेढलेला आहे. जवळच पर्वत आहेत. कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम आणि भांडारपदर गावांजवळील जंगलात ही चकमक सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss