विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : ५ सप्टेंबर २०२३ रोजी पोस्टे चामोर्शी येथे अल्पवयीन फिर्यादी तथा पिडीता हिने येवून तक्रार दिली की, तिच्या परिचयातील आरोपी संजु बबलु रॉय याने त्याचा नातेवाईक प्रदिप दिपक रॉय याचे मदतीने घरात बंदीस्त करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन चामोर्शी येथे गुन्हा नोंद करून तपास सुरु करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी प्रदिप दिपक रॉय यास चामोर्शी पोलीस स्टेशन मार्फत अटक करण्यात आली होती. परंतु, गुन्ह्याची चाहुल लागताच मुख्य आरोपी संजु बबलु रॉय हा त्याचे राहते घरातून तसेच परिसरातून फरार झाला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघून पोलीस अधीक्षक, नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आरोपीचा ठावठिकाणा मिळवित असतांना त्यांच्या असे निदर्शनास आले की, आरोपी वारंवार परराज्यात व परजिल्ह्यात राहुन त्याचा ठावठिकाणा बदलवित आहे.
तरीदेखिल तपास पथकांनी त्यांचे शोध घेण्याचे कार्य सुरु ठेवले असतांना त्यांचे गोपनिय सुत्रांकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, आज १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सदर गुन्ह्यातील फरार आरोपी संजु बबलु रॉय हा आष्टी-गोंडपिपरी मार्गावर त्याचे नातेवाईकास भेटण्याकरीता येणार आहे. त्या माहीतीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वरील मार्गावर सापळा रचून फरार आरोपी संजु बबलु रॉय यांस शिताफिने ताब्यात घेवून पुढील कायदेशिर कारवाईस्तव पोलीस स्टेशन चामोर्शी यांचे ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, नीलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांचे आदेशाने व पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. राहुल आव्हाड, पोशि/३९५१ प्रशांत गरफडे व चापोहवा/१६८१ मनोहर तोगरवार यांनी पार पाडली.