Latest Posts

नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून आयुष्यमान भव या कार्डचा लाभ घ्यावा : खासदार अशोक नेते

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्या सेवा सप्ताह पंधरवाडा या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी च्या वतीने स्थानिक प्राथमिक आरोग्य पथक येवली येथे आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी व वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशात सेवा पंधरवाडा कार्यक्रम सर्वत्र ठिकाणी घेण्यात येत आहे. या सेवा पंधरवाडा निमित्याने या शिबिराचा लाभ नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने घ्यावा असे आवाहन करत नागरिकांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन आरोग्य तपासणी करावी. व आयुष्यमान भव या कार्डाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.

याप्रसंगी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, सरपंच युवराज भांडेकर, तालुका सचिव मोरेश्वर भांडेकर, उपसरपंच प्रितम गेडाम, ग्रा.प. सदस्य चोखा बांबोळे, डॉक्टर रुडे, डॉक्टर कुमरे, डॉक्टर पवार, आरोग्य सहाय्यक तुळशीदास भजभुजे, मनोहर चचाणे, सुरेश भोयर, आरोग्य कर्मचारीवृंद तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विलास पा. भांडेकर यांनी केले.

Latest Posts

Don't Miss