विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस १५ कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन दक्षिण- पुर्वेस १२ कि.मी. अंतरावर असलेल्या महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवरील भुमकन गावाजवळ तळ ठोकुन आहे.
त्यावरुन अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे ०८ पथक व सीआरपीएफ चे ०१ क्युएटी सह सदर जंगल परिसरात तात्काळ माओवाद विरोधी अभियान सुरु करण्यात आले.
सदर जंगल परिसरात शोध मोहिम सुरु असतांना माओवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारास अभियान पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. काल रात्री १८.०० वा., २३.३० वा आणि आज पहाटे ०४.३० वा. च्या अंधारात गोळीबार सुरुच होता.
सदर चकमकीमध्ये माओवाद्यांनी अभियान पथकावर बीजीएल (एक्रख्र्) मारा केला. परंतु अभियान पथकाने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. अभियान पथकाचा वढता दबाव पाहुन अंधाराचा फायदा घेवुन माओवादी घटनास्थळावरुन पळून गेले.
आज सकाळी सुर्योदया बरोबर घटनास्थळावर शोध मोहिम राबविण्यात आली. यात मोठया प्रमाणावर माओवादी सामान, साहित्य, वायर, जिलेटीन स्टीक्स, बॅटरी, सोलर पॅनल ई. साहित्य जप्त करण्यात आले. सदर जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान सुरु आहे.
सदर अभियानामध्ये सहभागी जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतूक केले असून, सदर परिसरात माओवादीविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.