Latest Posts

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : निकालाची तारीख जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : बरावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ आता लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दहावीच्या निकालाची (SSC Result) धाकधूक वाढली आहे. दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता आहे. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर केला जाणार असून, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी थेट लिंक: https://mahresult.nic.in/ किंवा https://mh-ssc.ac.in. 

Latest Posts

Don't Miss