Latest Posts

सिव्हील लाईन चौकातील पुरातन हनुमान मंदीरात डॉ. अशोक जीवतोडे यांनी राबविली स्वच्छता मोहीम

– नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या महासोहळ्याच्या पार्श्वभुमीवर देशभरातील सर्व मंदीरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन प्रधानमंत्री माननिय नरेंद्र मोदी यांनी केले असल्याने दि. १६ जानेवारी रोजी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी चंद्रपूर शहरातील सिव्हील लाईन चौकातील पुरातन हनुमान मंदीरात स्वच्छता मोहीम राबवून प्रार्थना व पुजा अर्चना केली.

या स्वच्छता मोहीमेमध्ये डॉ. अशोक जीवतोडे यांचेसह या परिसरातील दादा दहेकर, मनोहर गाठे, राजेंद्र डारलिंगे, सचिन दिघाडे, प्रवीण दिघाडे, नितीन कुकडे, प्रकाश गाठे, शामराव बदकुलवार, मधुकर हिरादेवे, सतीश शाहू, सतीश बिजेवार, गोपाळ वाटेकर, अनिल काळे, प्रवीण साखरकर, डॉ. आशीष महातळे, रवि देवाळकर, किशोर ठाकरे, रविकांत वरारकर, प्रविण जोगी, पीयुष मेश्राम, रवि जोगी, महेश यार्दी, जितेंद्र केराम, आदी व परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांनी उपस्थितांना शहारातील विविध मंदीर परिसरात नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन केले.

Latest Posts

Don't Miss