विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी (Ashti) : प्रत्येकालाच सैनिक भरती होऊन राष्ट्रसेवा करण्याची संधी मिळत नाही. पण व्यक्ती अमीर असो गरीब,शिक्षक असो अशिक्षित, शहरी असो ग्रामीण प्रत्येकाने स्वच्छता पाडली तर हीच खरी राष्ट्रसेवा आहे. असे मार्गदर्शन गणेश जंगले PSI यांनी केले.
केंद्र सरकार द्वारा निर्देशक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीच्या प्राचार्य डॉ. संजय फुलझले यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभाग, लोकसंख्या विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा लॉयड मेटल्स एनर्जी लिमिटेड कोनसरी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक तास एक साथ या अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या अभियान अंतर्गत केवळ कचरा साफ करणे. म्हणजेच स्वच्छता नाही तर प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण पूरक जीवनशैली राबवून आणि आपले जीवन पर्यावरण पूरक बनवावे.
त्याकरिता फार मोठे नाही तर छोटे छोटे उपयोग करण्यात यावे उदा. बाजारात जाताना जसा आपण मोबाईल नेतो त्याच्यासारखे कापडी थैली न्यावी. आपल्या जीवनातून प्लास्टिक च्या उपयोग कमीत कमी करावा. त्याचबरोबर वृक्षरोपण, पशुपक्षी यांच्या करीता अनुकूल वातावरण बनवून स्वच्छता अभियान राबवण्यात यावे, असे प्रा. डॉ. भारत पांडे समाजशास्त्र यांनी मार्गदर्शन केले.
त्यासोबतच या स्वच्छता अभियानांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पशुवैद्यकीय दवाखाना, पोलीस स्टेशन रोड, चंद्रपूर- चामोर्शी रोड या ठिकाणी लायर्ड मेटल्स कंपनी कोनसरी यांच्या सहकार्यातून स्वच्छता अभियान राबवून सामान्य जनतेला स्वच्छता विषयी जागरूक राहण्याचे एक मुख संदेश दिला.
त्यासोबतच अनेक गावकऱ्यांनी ही शिकणारे मुले जर आमच्या घरापुढे येऊन आमच्या परिसर स्वच्छ करत असेल तर आम्ही का बर मागे राहावे म्हणून अनेक गावकऱ्यांनी देखील स्वतःहून पुढाकार घेऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला त्यात विशेषता राहुल सिंग, मुन्ना हलदर, रुपेश तलांडे, अखिल शेडमाके, विशाल नेताम प्रफुल वेलादी, अशोक येडलावर बबलू पठाण, सुरज देवगडे व अन्य गावकऱ्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन आष्टी परिसरातील जनतेला एक स्वच्छतेच्या मुख संदेश दिला.
स्वच्छता अभियान पंधरवडा अभियान यशस्वी करण्याकरिता प्रा. डॉ. राज मुसणे, प्रा. डॉ. गणेश खुणे, प्रा. डॉ. रवी शास्त्रकार, प्रा. रवी गजभिये, प्रा. श्याम कोरडे, प्रा.ज्योती बोभाटे, प्रा. नाशिका गबने, प्रा. विजया सालुरकर, राज लखमापूरे, नाकाडे, संजीत बचाड, मोहम्मद मुस्ताक, संतोष बारापात्रे, विनोद तोरे, दिलीप मडावी, लोमेश गुटके व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.