Latest Posts

लिपीक टंकलेखक पदासाठी २८ नोव्हेंबरला मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवार ७ डिसेंबरपासून विधानभवन नागपूर येथे सुरू होणार आहे. अधिवेशन कालावधीकरिता लिपिक – टंकलेखकाची एकूण १० पदांसाठी तसेच शिपाई, संदेशवाहक यांची एकूण २२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून २७ ऐवजी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विधानभवन नागपूर येथे सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे घेऊन तसेच शिपाई, संदेशवाहक पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर यांनी केले आहे.

 

Latest Posts

Don't Miss