Latest Posts

जिल्हाधिकारी डॉ.कोलते व पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मतदान केंद्रांना भेट

– देवनारा हिवरा येथील एसएसटी पथकांना भेटी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : विधानसभा मतदानाचा दिवस अवघ्या अकरा दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. जिल्ह्यात प्रचाराला वेग आला असून अंतिम लढती ५० उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन ऑन फिल्ड आहे ,त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते व पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या एसएसटी (स्थिर सर्वेक्षण पथक )तसेच एफएसटी म्हणजे फिरत्या पथकांच्या कामांना आज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आज अकस्मात रित्या भेटी देऊन त्यांच्या कामाची पाहणी केली.

आज जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वरठी येथील मतदान केंद्र असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मतदान केंद्र क्रमांक ३१४, ३१५ नव प्रभा शाळेतील  मतदान केंद्र ३१६, ३१७, ३१८ आणि एसएसटी पथकाला देखील भेट देवून निवडणूक कामाची माहिती घेतली. मोहाडी तालुक्यातील पाच मतदान केंद्रांना मतदान केंद्र क्रमांक १४० ते १४४ यांना भेट देऊन मतदानाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या दिव्यांग बांधवांच्या सोयीसुविधा आणि तसेच मतदान केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी केली.

मोहाडी तालुक्यातीलच हिवरा येथील आंतर जिल्हा एसएसटी पथकाला देखील त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तुमसर तालुक्यातील देवनारा येथे मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमारेषेवरील असलेल्या एसएसटी पथकाला भेट देऊन आवश्यक असलेल्या सूचना तसेच त्या एसएसटी पथकाद्वारे ठेवण्यात येणाऱ्या नोंदीचे निरीक्षण केले  तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा येथील मतदान केंद्र क्रमांक ४५, ४२, ४७ येथे देखील भेट दिली. यावेळी तहसीलदार मोहन टिकले, पोलीस अधिकारी तसेच एसएसटी पथकातील विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनात विविध विभागांच्या बैठकींना बैठकी तसेच नोडल अधिकाऱ्यांच्या देखील बैठकी सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर ला होणार असून त्यासाठीचा प्रचार १८ नोव्हेंबर ला सायंकाळी सहा वाजता समाप्त होणार आहे. २३ ला मतमोजणी प्रक्रिया असून २५ नोव्हेंबर पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

Latest Posts

Don't Miss