Latest Posts

जिल्हाधिकारी संजय दैने यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

– लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी ‘गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी 

– १६ एप्रिल रोजी होणार प्रसारण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई (Mumbai) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज याविषयी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था  कार्यवाही, माध्यमप्रमाणी करण समितीचे कामकाज, सर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याबाबत संजय दैने यांनी माहिती दिली आहे. गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची मुलाखत मंगळवार १६ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार १६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक –
एक्स- https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR
यूट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

Latest Posts

Don't Miss