Latest Posts

कॉम्प्युटर दुकान ला भीषण आग : १० लाखाचे नुकसान 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : शहरातील मुख्य मार्गावरील गुरुद्वारा जवळील दुर्गा माता बंगाली समाज कॉलनी परिसरात कॉम्प्युटर दुकान ला भीषण आग लागून खाक झाले असून दहा लाखाचे नुकसान झाले आहे.

आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील दुर्गामाता मंदिर जवळील सचिन बावणे यांच्या मालकीचे प्रभू कॉम्प्युटर ला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. नागरिकांचा लक्षात येताच त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण केले. दुकानाच्या मागच्या बाजूला नागरी वस्ती असून वेळीच अग्निशमन दलाचे जवान यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ केले.

या आगीत कॉम्प्युटर दुकानातील २५- ३० कॉम्प्युटर, लॅपटॉप तसेच दुरुस्ती करीता ग्राहकाचे १५- २० कॉम्प्युटर व लॅपटॉप तसेच कॉम्प्युटर ला लागणारे सामान जळून खाक झाले. त्यात अंदाजे १० लाखाचे नुकसान झाले.

Latest Posts

Don't Miss