Latest Posts

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन

– आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२४ 

 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी रविवार २५ फेब्रुवारी २०२४  रोजी सकाळी ११ वाजता प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ६ वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या व इयत्ता ७ वी ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरून काढण्यासाठी सन २०२३-२४ या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी तसेच इयत्ता ६ ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित / आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, जांबुळघाट, ता. चिमुर येथे प्रवेशपूर्व स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, अशा प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक / शिक्षक / मुख्याध्यापक यांनी सविस्तर माहिती व परीक्षा आवेदन पत्रासाठी नजीकच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे संपर्क करावा. आवेदनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२४ आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील अनुसूचित जमाती व आदिम जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूरचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss