विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १ हजार तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु. ५ हजार (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही, अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे.
सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. या साठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदार पैकी ६८ लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासंम्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत. यांची e-kyc करणेची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त राहिलेले २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार e-kyc करणे आवश्यक आहे. या पैकी २.३० लाख खातेदार यांनी २५ सप्टेंबर २०२४ अखेर e-kyc पूर्ण केले आहे.
त्वरित शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
१. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवासी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे login मध्ये उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या OTP च्या माध्यमातून e-kyc करतील.
२. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात (CSC) जावून सुद्धा e-kyc करु शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status येथे click केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील Biometric मशिनच्या माध्यमातून ते e-kyc पूर्ण करु शकतात.
तरी शेतकऱ्यांनी तात्काळ e-kyc करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा.