Latest Posts

वेडसर तरुणाने आई, पत्नी आणि मुलांची हत्या करून स्वत:ही केली आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : उत्तर प्रदेशमध्ये एका वेडसर तरुणाने आई, पत्नी आणि मुलांची हत्या करून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने आधी गोळ्या घालून आईला ठार केले, त्यानंतर पत्नीवर हातोड्याने वार करत तिला संपवला. मग लहान मुलांना छतावरून फेकून त्यांचाही जीव घेतला आणि स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. सितापूर जिल्ह्यातील मथुरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या पल्हापूर गावात ही भयंकर घटना घडली आहे.

माहितीनुसार, पल्हापूर गावातील शेतकरी कुटुंबातील अनुराग सिंह याने शुक्रवारी रात्री हे हत्याकांड केले. मानसिक रुग्ण असलेल्या अनुरागने आई सावित्री देवी (६२), पत्नी प्रियंका सिंह (४०), मोठी मुलगी अश्विनी (१२), मधली मुलगी अश्वी (१०) आणि सर्वात लहान मुलगा अद्वैत (६) यांची हत्या केली. त्यानंतर स्वत: गोळी झाडून आत्महत्या केली.

सदर घटना शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

आरोपी मानसिक रुग्ण आणि वेडसर होता. तसेच त्याला नशा करण्याची सवय होती. कुटुंबीय त्याला नशामुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होते. यातूनच शुक्रवारी रात्री मोठा राडा झाला आणि त्यानंतर हे हत्याकांड घडले.

Latest Posts

Don't Miss