Latest Posts

महिलांनी केंद्र व राज्य शासन तसेच माविमच्या सहकार्यातून स्वतः च्या उद्योग निर्माण करावे : माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. माविम च्या वतीने महिलांचे संघटन करणे, महिलांच्या क्षमता विकसित करणे, आत्मविश्वास वाढविणे, उद्योजकीय विकास घडवून आणणे, रोजगाराच्या संधी व बाजारपेठ यांची सांघड घालणे, महिलांचा शिक्षण, संपत्ती व सत्तेत सहभाग वाढवणे, स्थायी विकासासाठी स्वयंसाहाय बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे व ईतरही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. याकरिता महिलांनी माविम चे सहकार्य घ्यावे. असे आवाहन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीता पिपरे यांनी केले.

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)गडचिरोली, सखी लोकसंचालित साधन केंद्र गडचिरोली मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान व स्वयंसहाय्य महिला बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंची तालुकास्तरीय नवतेजस्विनी भव्य प्रदर्शनी व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवन  येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

यावेळी लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिजामाता पुरस्कृत प्राप्त श्रीमती प्रतिभा चौधरी, माविम जिल्हा समन्वयक अधिकारी विष्णुपंत झाड, श्रीमती अश्विनी जांभुळकर, श्रीमती सीमा वसाके, श्रीमती  गिता गुड्डी, कविता उरकुडे तसेच सखी लोकसंचालित साधन केंद्र गडचिरोली येथील समस्त कार्यकारणी सदस्य व बचत गटातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Latest Posts

Don't Miss