Latest Posts

मनाला शांती व आनंद निर्माण करणारा श्रीमद् भागवत कथा : खासदार अशोक नेते

– श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे गडचिरोली येथे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोपट बिल्डींगच्या परिसरात गडचिरोली येथे पुज्य महंत भरत शरणजी महाराज वृंदावन यांच्या वाणीतून आयोजित करण्यात आले होते.

या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहामुळे मनाला शांती व आनंद निर्माण होतो.अध्यात्मिकने आचार विचारांची देवाण-घेवाण होते. चांगले विचार आत्मसात या माध्यमातून केले जाते. त्यामुळे आजच्या काळात अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे. असे विचार खासदार अशोक नेते यांनी याप्रसंगी मनन केले.

गडचिरोली परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी या प्रसंगी केले.

याप्रसंगी खासदार अशोक नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, माजी जि.प. अध्यक्ष समया पसुला तसेच आयोजक रघुनाथ प्रसाद राठी, हुलास राठी, कैलास राठी तथा समस्त राठी परिवार, गडचिरोली आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त मान्यवर उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss