Latest Posts

खेळाच्या माध्यमातून क्रीडा कलागुणांना वाव मिळते : माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : शारीरिक सुदृढ व आरोग्यासाठी युवकांनी खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील युवक खेळाच्या माध्यमातून आपले व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक करावे तसेच आपल्यातील क्रीडा व कला गुणांना वाव मिळते, असे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी गोंडवाना व्हॉलीबॉल क्लब नंदीगाव च्या वतीने आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन प्रसंगी उदघाटक स्थानावरून प्रतिपादन केले.

नंदीगाव येथे ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळ खेळण्याचे संधी प्राप्त होण्यास ग्रामिण व्हॉलीबॉल सामने अजय कंकडालवार यांच्या सहकार्याने उपसरपंच हरीश गावडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले.

सदर स्पर्धेत परिसरातील चाळीस संघाने सहभाग घेतले आहेत. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून देवलमरीचे ग्राम विकास अधिकारी वाय. लाडे, भास्कर तलांडे माजी पंचायत समिती सभापती, मुख्याध्यापक आर.एल. कंगाले ग्रामपंचायत सदस्य विद्या राऊत, माजी उपसरपंच जगनाथ मडावी, नागेश शिरलावार, रमेश आलाम, राजाराम चे मुत्ता पोरतेठ, श्रीनिवास राऊत, प्रमोद आत्राम आदी उपस्थित होते.

कार्यक्रमातचे संचालन संदीप दुर्गे प्रस्तावित दिलीप मडावी तर आभार प्रदर्शन प्रकाश मडावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते करिता गोंडवाना व्हॉलीबॉल क्लब नंदीगावचे कार्यकारी युवक मंडळ आनंद सिडाम, विकास सोयाम, स्वप्नील तोरेम, अरविंद, श्रीकांत सिडाम, चंद्रप्रकाश पप्रेमीला दुर्गे, यशोदा दुर्गे या महिलांनी सहकार्य केले.

Latest Posts

Don't Miss