Latest Posts

गुन्हे शोध पथकाद्धारे ॲल्युमिनीअम तार चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून लाखोचा मुद्देमाल केला जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपुर (Chandrapur) : पोलीस स्टेशन पडोली येथे २५ मे २०२४ ला फिर्यादी शाम देविदास वाटगुरे (३७) रा. भिवापुर वार्ड चंद्रपुर यांनी पोस्टेला येवुन तक्रार दिली की, त्यांचे विश्वनाथ प्रोजेक्ट लिमिटेड हैद्राबाद या काजगी कंपनीकडुन महावितरण कंपनीकडुन नविन विद्युद वाहीनीचे काम घेतले असुन सदर काम सावली, वरोरा, गडचांदूर, वरोरा तसेच देवाडा, वेंडली, मार्डा, चोराळा, शिदुर या टिकाणी विद्युत वाहीनीचे काम सुरु असुन कंपनीने देवाडा ते चोराळा शेतसिवासमधे विद्युत वाहीनी करीता ईलेक्ट्रीकचे नविन पोल उभे करुन त्यावर ॲल्युमिनिअम तार ओढते असुन त्याच परीसरात काम चालु आहे २१ मे २०२४ ते २३ मे २०२४ या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरानी देवाडा ते चोराळा शेतशिवारात विद्युत वाहीनीकरीता लावण्यात आलेले नविन ईलेक्ट्रीक पोलवरील अंदाजे ०५ ते ०६ खांबावरील १५० मीटर ॲल्युमिनिअम तार कि. ६० हजार रु. किमतीचे कापुन चोरुन नेले. अशा फिर्याटवरुन पोस्टेला पोस्टे अप क्र. १०९/२०२४ कलम ३७९, ३४ सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलीस अधिक्षक मुमवका सुदर्शन चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु चंद्रपुर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतस्कर यांनी गुन्हे शोध पथक पडोली यांना पोस्टेला चोरीचे गुन्हयाची दाखल बाबत गांभीर्य लक्षात घेता अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिल्यावरुनस डीबी इंचार्ज स. फौ. कैलास खोब्रागडे सोबत पोहवा विनोद वानकर, पोअं प्रतिक हेमके, पोअं धिरज भोयर, पोअं कोमल मोहजे यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाचे अज्ञात आरोपीचा शोध करीत असतांना २५ मे २०२४ ला मिळालेल्या मुखबीश्वे खबरेवरुन नमुद आरोपी १) सागर सुभाष रंगारी (१९) धंदा ड्रायव्हर जात महार रा. म्हाडा कॉलनी मागे गणेश रेसिडेन्सि दाताळा ता.जि. चंद्रपुर २) रोहीत आदेश ईलमकर (२५) धंदा मजुरी जात महार रा. मेजर गेट समोर दुर्गापुर रोड चंद्रपुर ३) अंकित महेश मोहबे (१९) धंदा-मजुरी जात- चांभार रा. दुर्गापुर वार्ड क्र. ०३ चंद्रपुर ४) प्रशांत सुरेश डोंगरे (२२) धंदा मजुरी जात- महार रा. इंदिरा नगर चंद्रपुर ५) आदित्य शेषराव नगराळे (१९) धंदा शिक्षण जात महार रा. मेजर गेट समोर दुर्गापुर रोड चंद्रपुर ६) सोनु निलराज कांबळे (२४) धंदा मजुरी जात महार रा. दुर्गापुर वार्ड क्र. ०३ चंद्रपुर ७) स्वप्नील यादव ढोरके (२५) धंदा मजुरी जात महार रा. दुर्गापुर वार्ड क्र. ०२ चंद्रपुर ८) रोहन रुपचंद शहारे (२३) धंदा- शिक्षण जात महार रा. दुर्गापुर वार्ड क्र. ०४ चंद्रपुर १) क्रिष्णा मंगल दुमने (१८) धंदा अँटो चालक जात महार रा. मेजर गेट समोर दुर्गापुर रोड चंद्रपुर हे संशयास्पद फिरत असल्याची माहीती देवेडा चोराळा कडील भागात संशयात्पद रित्या पिरत असल्याचे खबरेवरुन त्यांना पकडुन विचारपुस केली प्रथमता ते उडवाउडविचे उत्तरे दिली. त्यांचेबाबत अधिक माहीती प्राप्त केल्याने ते गुन्हेगारी वृत्तीचे असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्यांना पोस्टेला आणुन विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना पोस्टे पडोली अप क्र. १०९/२०२४ कलम ३७९, ३४ भादवि या गुन्हयात अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यांना परत विश्वासात घेवुन विचारपुस केल्याने मुख्य पाहीजे असलेला आरोपी पाहीजे असलेला आरोपी जागो उर्फ ज्ञानेश्वर गुलाब आंबोरकर रा. मेजर गेट ता.जि. चंद्रपुर याचे सोबत मौजा देवाडा चोराळा वेंडली सिदुर भागातील ईलेक्ट्रीक लाईनवरील ॲल्युमिनिअम ताराची कटच्या सहय्याने चोरी केल्याचे सांगितले असुन पोस्टे मुल हद्दीत सुद्दा चोरी केल्याचे कबुली दिली असुन पोस्टे मुल येथे अप क्र. २१४/२०२४ कलम १३६ भाविका अप क्र. २१५/२०२४ कलम १३६ भाविका अन्वये गुन्हे नोंद असल्याबाबत माहीती प्राप्त झाली तसेच शिदुर मार्डा व वेंडली येथील सुहा ईलेकर्दीक पोलवरील ॲल्युमिनिअम ताराची चोरी केल्याचे सांगत आहे.

नमुद टोळीने चंद्रपुर शहर परिसर तसेच जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोस्टे पडोली अप क्र. १०९/२०२४ कलम ३७९, ३४ भादवि मधिल गुन्हयातील चोरीस गेलेला ॲल्युमिनिअम तार १ हजार ५०० मीटर कि. ६० हजार रु. गुन्हयात वापरलेले ०३ मोटारसायकल ०१ आँटो व ०८ नग मोबाईल तसेच तार कापन्याकरिता दोन गोल लोखंडी कटर व नायलॉन दोरी असा एकुन ५ लाख १५ हजार ५० रु. चा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमवका सुदर्शन चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु चंद्रपुर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतस्कर, पोउपनि विटोले यांचे नेतृत्वात गुन्हे अन्वेषन विभागाचे इंचार्ज स.फौ. कैलास खोब्रागडे, पोहवा विनोद वानकर, पोअं प्रतिक हेमके, पोअं धिरज भोयर, पोअं कोमल मोहजे, पोअं पंकज किटे, पोअं संदिप सातपुते यांनी पार पाडली.

Latest Posts

Don't Miss