Latest Posts

डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला २५ जूनपर्यंत मुदतवाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे सदर अर्ज भरण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इत्यादी बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. हर्षलता बोराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss