विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी नवरात्र दुर्गा उत्सव, व माता शारदा देवी उत्सव मोठ्या आनंदाने भक्तीभावाने श्रद्धेने साजरा केला जातो.
या उत्सवाच्या निमित्याने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली येथील जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ गांधी चौक, आशीर्वाद नवदुर्गा उत्सव मंडळ चामोर्शी रोड, माता नवदुर्गा महिला उत्सव वार्ड.नं. २० रामनगर, श्री. गुरुदेव समाज सेवा मंडळातील रामनगर येथे माता शारदा देवी अशा या गडचिरोली येथील विविध ठिकाणच्या खासदार अशोक नेते यांनी मा दुर्गा माता व शारदा देवी मातेचे दर्शन घेत विधीवत पूजा अर्चना करत आरती केली.
याप्रसंगी चामोर्शी रोड वरील आशीर्वाद नवदुर्गा उत्सव मंडळाने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खासदार अशोक नेते यांनी महाप्रसाद स्वतः हातात चमच घेऊन पंगती मध्ये भोजन वाढले, यावेळी माता चरणी नतमस्तक होऊन जनतेला सुख- समृद्ध, आरोग्यदायी संपन्न लाभो अशी प्रार्थना केली.