Latest Posts

भद्रावती : रस्त्यावरील डिव्हायडर जवळ आढळले मृत अर्भक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भद्रावती (Bhadravati) : शहरातील जंगल नाका परिसरात मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये २२ ऑगस्ट रोज मंगळवार ला सकाळी एक नवजात मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मृत अर्भक हे पुरुष जातीचे आहे.

सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आवश्यक ती कारवाई करीत पंचनामा केला व मृत अर्भकाला पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. प्रत्यक्ष दर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार एका कुत्र्याने हे मृत अर्भक तोंडात पकडून आणले होते. नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला असता कुत्र्याने हे अर्भक तेथेच टाकून पळ काढला.

शहरात नवजात अर्भक सापडल्याची दोन वर्षातील ही तिसरी घटना आहे. याआधी चंडिका मंदिराजवळ एक जिवंत नवजात अर्भक सापडले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या घंटा गाडीमध्ये एक मृत अर्भक आढळले होते. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

Latest Posts

Don't Miss