Latest Posts

जिवंत विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने बिबट व माकड या दोन्ही वन्यप्राण्यांचा मृत्यू : सिंदेवाही तालुक्यातील भेंडाळा येथील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindewahi) : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र सिंदेवाही, नियतक्षेत्र डोंगरगांव मधिल मौजा भेंडाळा गट क्र. १२ श्रीमती कमलाबाई महादेव पेंदाम याचे शेतामध्ये ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी ११ के.व्ही. डीस्ट्रीब्युशन लाईन जिवंत विद्युत ट्रान्सफॉर्मर वर बिबट (मादी) १ व माकड (बंदर) १ मृत अवस्थेत आढळुन आले असल्याची माहीती अधिनिस्त वनकर्मचारी यांचे कडून भ्रमणध्वनी व्दारे प्राप्त झाली. त्यानुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही हे अधिनिस्त वनकर्मचारी व RRU चमु सिंदेवाही यांना घेवून मोकास्थळी पोहचले.

सदर घटनेची पाहणी केली असता, घटनास्थळावर १ बिबट (मादी) व माकड (बंदर) मृत अवस्थेत असल्याचे आढळले. सदर घटनेची माहीती वरिष्ठ अधिकारी व विज वितरण विभाग. सिंदेवाही यांना भ्रमणध्वनी व्दारे कळविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळावर एम. बि. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी,  विवेक करंबेकर, मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी वनविभाग व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी यश कायरकर, स्वॅब नेचर केअर फॉडेशन, सावरगांव डॉ. विनोद सुरपाम, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती. सिंदेवाही, डॉ. शालीनी लोंढे, पशुधन विकास अधिकारी, सिंदेवाही व विज वितरण विभागाचे कर्मचारी  हजर झाले. त्यांनी मृत बिबटचे निरिक्षण केले.

सदर बिबट्याचे सर्व अवयव शाबुत असल्याची कुठलाही घातपाताचा प्रकार नसल्याची खात्री केली व जिवंत विद्युत प्रवाहाच्या आघाताने दोन्ही वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. मौकास्थळ परिसरानजीक वनक्षेत्र नसल्याचे व शेतशिवार असल्याचे दिसून आले.

सदर प्रकरण शिकारीचे नाही याची खात्री वरिल सर्व उपस्थित अधिकारी यांनी केल्यानंतर उपस्थित अधिका-याच्या समक्ष मौका पंचनामा नोंदवून नोंद करण्यात आला. मध्यवर्ती काष्ट भांडार, सिंदेवाही येथे सकाळी ११:५० वाजता पासुन दुपारी १२:२० वाजता पर्यंत डॉ. विनोद सुरपाम व डॉ. शालीनी लोंढे यांनी सदर वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन करून उत्तरिय तपासणी करीता नमुने (विसेरा) घेण्यात आले. शवविच्छेदनाची संपुर्ण कार्यवाही करून सदर वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर वरिल सर्व अधिकारी व पंचासमक्ष दोन्ही वन्यप्राण्यांचे संपुर्ण अवयव पुर्णपने जाळण्यात आले असुन, दहन पंचनामा नोंदविण्यात आलेला आहे.

सदर नमुने उत्तरिय तपासणी करीता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असुन उत्तरिय तपासणीचा अहवाल आल्यानंतर व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेनंतर मृत्यूचे कारण तसेच व इतर बाबी स्पष्ट होईल.

Latest Posts

Don't Miss