Latest Posts

बल्लारपूर : अनोळखी इसमाचा मृत्यू 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : आज १८ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शेत शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.

बामणी गुरुनानक कॉलेज चा मागील शेत शिवारात एक अनोळखी पुरुष ५५ ते ६० यांना ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे औषधोपचार करण्यात आणले असता वैद्यकिय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. त्यावरून पो ठाणे बल्लारपूर येथे अकस्मात मृत्यू क्र. ११२/२०२३ कलम १७४ फौं. प्र. स. अन्वये नोंद केला असून सदर प्रकरणात प्राथमिक चौकशी सा. फौ. धनंजय गिन्नलवार यांनी केली असून सदर चे प्रेत हे ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथील मरचुरी मध्ये ठेवण्यात आले आहे.

सदर मृतक ५ फूट ६  इंच लांब, (५५ ते ६० वर्ष), काळा सावळा रंग, लांबट चेहरा, बारीक बांधा, काळे पांढरे केस, अंगात निळी कॉलर वाली टी शर्ट, गुलाबी रंगाचा हाल्फ बर्मुडा, दात समोरचे पडलेले व समोर दात आलेले असून सदर अकस्मात मृत्यू मधील अनोळखी इसमास ओळखीचे असेल त्यांनी पोलीस ठाणे बल्लारपूर येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

पो. ठाणे बल्लारपूर लँडलाईन क्र. ०७१७२२४०२७

Latest Posts

Don't Miss