Latest Posts

जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीची झालेली जमानत रद्द होऊन करागृहात रवानगी

– गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा न्यायनिर्णय 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पोलीस ठाणे आरमोरी हद्दीतील माजा मानापूर येथे २५ एप्रिल २०२३ रोजी २०:०० वाजेच्या दरम्यान गैरअर्जदार / आरोपी अमोल उध्यवराव साखरे (३४) रा. मानापूर याने फिर्यादीचे काकास जुन्या वादावरुन जिवे ठार मारण्याच्या हेतुने डोक्यावर काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. आरोपी विरुद्ध फिर्यादी यांनी आरमोरी पोलीस स्टेशन येथे २६ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ०१.०० वा फिर्याद देउन, सदर फिर्यादीची दखल घेवून आरमोरी पोलीस स्टेशन येथे अप.क्र. १४६/२०२३ कलम ३०७ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयातील आरोपीला २६ एप्रिल २०२३ रोजी १९.०० अटक करुन तपासाअंती आरोपी/ गैरअर्जदार वाला न्यायालयीन कोटडीमध्ये चंद्रपुर कारागृहात रवाना करण्यात आले. सदर गुन्हयातील प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे दाखल असून ३१ ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयाचे आदेशात दिलेल्या शर्ती व अटीच्या अधीन राहून आरोपीस जामीन मंजुर करण्यात आला होता.

परंतु ०४ सप्टेंबर २०२३ रोजी आरोपी / गैरअर्जदार हा त्याचे स्वगायी जावुन पुन्हा फिर्यादीचे काका हे गावातील चौकात असतांना मागे तुला मारले होतो. तेव्हा तू वाचलास आता तुला मारूनच टाकीन, तुला सोडणार नाही असे म्हणुन धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीचे काका यांनी ०७ सप्टेंबर २०२३ रोजी आरमोरी पोलीस स्टेशन येथे आरोपी / गैरअर्जदार अमोल साखरे याने दिलेल्या धमकी बाबत रिपोर्ट दिली असता पोलीस स्टेशन अधिकारी आरमोरी यांनी एनसी. क्र. २९७/२०२३, कलम ५०६ भा.द.वी अन्वये गुन्हा नोंद केला सदर अपराध हा अदखलपात्र स्वरुपाचा असल्याने कोटांत दाद मागण्याची समज दिली व त्यासंदर्भात आरोपी / गैरअर्जदार अमोल उध्यचराव साखरे यांना पोस्टे आरमोरी येथे इस्तेगाशा क्र. ४२ / २०२३. कलम १०७, ११६ (३) सीआरपीसी अन्वये कारवाई करून तालुका दंडाधिकारी आरमोरी यांच्या कार्यालयात न्यायप्रविष्ट असतांना सुध्दा सदर आरोपी / गैरअर्जदार अमोल उच्चवराव साखरे हा सतत मौजा मानापूर गावात जावुन फिर्यादीचे काकास जीवंत मारण्याची धमकी देत होता व माझे विरुद्ध न्यायालयात ज्याण दिल्यास तुला पहिल्यांदा सोडलो पण आता सोडणार नाही अशी धमकी देत असल्याने सदर पीडीत व्यक्तीने जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे आरोपी / गैरअर्जदार अमोल उध्यवराव साखरे यांची जमानत रद्दबाबत दाद मागीतली असता २६ सप्टेंबर २०२३ रोजी न्यायालयाने सदर घटनेचे गांभीर्यपूर्वक विचार करून गैरअर्जदार / आरोपी अमोल उययराव साखरे रा. मानापूर ता. आरमोरी यांची झालेली जमानत रद्द करून त्यास पूर्वचत न्यायालयीन कोठडीमध्ये चंद्रपुर कारागृहात रवानगी केली.

सदर कार्यवाहीत सरकारतर्फे शासकिय अभियोक्ता अनिल प्रधान, विशेष अभियोक्ता उमेश कुकडकर यांनी युक्तीवाद केले. तसेच सदर प्रकरणात तपासी अधिकारी पोस्टे आरमोरी, कोर्ट पैरवी अधिकारी, अंमलदार यांनी कामकाज पाहिले.

Latest Posts

Don't Miss